Balala Ka Mp3 İndir
निजली रात, निजे चांदोबाही
बाळाला झोप का गं येत नाही?
निजली रात, निजे चांदोबाही
बाळाला झोप का गं येत नाही?
सांगता-सांगता माझी दमली कहाणी
मिटावीत फुले तशी मिटू दे पापणी
गुणगुण करतांना शिणली अंगाई
निजली रात, निजे चांदोबाही
बाळाला झोप का गं येत नाही?
धावुनिया तुझ्यापाठ दिस गेला सारा
घरभर साऱ्या तुझ्या खेळाचा पसारा
धावुनिया तुझ्यापाठ दिस गेला सारा
घरभर साऱ्या तुझ्या खेळाचा पसारा
मागितले, जे-जे तुला दिले मी आणून
सारे देता येते नीज आणावी कुठून?
ज्योत जीवाची जीवाने का रे उजळत नाही?
बाळाला झोप का गं येत नाही?
नको दचकू असा मी कुठे जात नाही
बाळ जागे आणि कधी निजते का आई?
नको दचकू असा मी कुठे जात नाही
बाळ जागे आणि कधी निजते का आई?
फार-फार भागलास आता घे विसावा
सारा-सारा शिणवटा मिटू-मिटू यावा
तुझे सोसणे हे मला सोसवत नाही
बाळाला झोप का गं येत नाही?
बाळाला झोप का गं येत नाही?
निजली रात, निजे चांदोबाही
बाळाला...

